यात्री निवास व यात्री भुवन

यात्री निवास व यात्री भुवन मध्ये बुकिंग करण्यास खालील दूरध्वनी वर संपर्क करावे. खालील क्रमांकावर फोन करून आरक्षण करता येईल.

  •    यात्री निवास संपर्क क्रमांक - ०२१८१ - २२२५५५, ९०६७३००५५५  
  • यात्री भुवन संपर्क क्रमांक- ०२१८१ - २२२५८७, ९०६७६७०५८७  

Mobirise

यात्री निवास संपर्क क्रमांक -  ०२१८१ - २२२५५५, ९०६७३००५५५

ही इमारत मंदिरसदृश्य असुन भव्य आणि देखणी वास्तु आहे. ही वास्तु म्हणजे सोलापुर जिल्हयाच्या सौंदर्यात भर असे म्हटले तरी वावगे ठरू नये. ही इमारत ३ मजली असुन या इमारतीत मोठे १८ हॉल्स आणि 66 खोल्या आहेत. ही इमारत १५००० चौ.फुट जमिनीवर व्यापली आहे. या इमारतीत अंदाजे ५००० स्वामीभक्त आराम करतील अशी क्षमता व व्यवस्था येथे आहे. तसेच या इमारतीमध्ये जवळपास ७५ च्यावर सेवेकरी अहोराञ पाळयांमध्ये काम करीत असतात. या ठिकाणी लॉकर्सची सुविधा आहे. कार्यतत्पर सेवेकरी, स्वच्छता टापटीप, हवेशीरपणा, प्रसन्न व मोकळे वातावरण, सेवेकर्यांची विनम्र वागणुक, भरपुर पाणी, सुरक्षा व्यवस्था आणि वाहनतळ लगतच अन्नछञ व अगदी समोरच श्री. स्वामी समर्थांचे मंदिर तसेच नाममात्र देणगी शुल्क अशी या वास्तुची वैशिष्टये आहेत.

यात्री भुवन संपर्क क्रमांक- ०२१८१ - २२२५८७, ९०६७६७०५८७  

ही इमारत यात्री निवास १ इमारती शेजारी असुन श्री शमिविघ्नेश गणेशमंदिरा समोर आहे. सद्या या इमारतीचे बांधकाम चालु असुन ही अद्यावत आणि आरामदायी व व्ही आय पी सुट ने परिपुर्ण असलेली इमारत आहे. सदर इमारतीत १०६ खोल्या असुन ही इमारत ३ मजली आहे. या इमारतीत १८ वातानुकूलीत खोल्या ए सी खोल्या प्रत्येक मजल्यास ६ आहेत. प्रसन्न व मोकळे वातावरण, सेवेकर्यांची विनम्र वागणुक, भरपुर पाणी, सुरक्षा व्यवस्था आणि वाहनतळ लगतच अन्नछञ व अगदी समोरच श्री. स्वामी समर्थांचे मंदिर तसेच नाममात्र देणगी शुल्क अशी या वास्तुची वैशिष्टये आहेत.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट, सोलापूर.

☎ दुरध्वनी : कार्यालय : ०२१८१ – २२११८० / यात्री निवास : ०२१८१ - २२२५५५ , ९०६७३००५५५ यात्री भुवन : ०२१८१ - २२२५८७, ९०६७६७०५८७
web: www.swamiannacchatra.org ✉ ई-मेल : contactus@swamiannacchatra.org